28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयमुख्यमंत्री बॅनर्जी यांना गंभीर दुखापत

मुख्यमंत्री बॅनर्जी यांना गंभीर दुखापत

कोलकाता : वृत्तसंस्था
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ममता बॅनर्जी त्यांच्या घराच्या आवारात चालत असताना पडल्या. यादरम्यान त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गुरुवारी कालीघाट गृहसंकुलात फेरफटका मारत होत्या. यावेळी त्या पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रक्तस्त्राव होऊ लागला. त्यांना तातडीने कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात नेण्यात आले. टीएमसीचे अखिल भारतीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी तेथे पोहोचले आहेत. टीएमसीने आपल्या हँडलवर ही माहिती दिली आहे. टीएमसीने लिहिले की, आमचे अध्यक्ष गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. ममता यांचा एक फोटोही समोर आला आहे. ज्यामध्ये त्यांच्या कपाळातून रक्त येत आहे. त्यांना कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या वर्षी जानेवारी महिन्यातदेखील ममता यांचा अपघात झाला होता. त्यावेळी त्या वर्धमानहून कोलकात्याला परतत होत्या. धुक्यामुळे कारचे ब्रेक लावताना ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR