16.9 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeराष्ट्रीयअरविंद केजरीवाल यांची तब्येत बिघडली, शुगर लेव्हल ४६ वर!

अरविंद केजरीवाल यांची तब्येत बिघडली, शुगर लेव्हल ४६ वर!

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळा प्रकरणी ईडीने अटक केली, त्यानंतर आज त्यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे, अरविंद केजरीवाल यांची शुगर लेव्हल ४६ पर्यंत घसरली आहे.

याआधी बुधवारी, केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी एक व्हिडीओ जारी केला होता, यात त्यांनी म्हटले होते की, मंगळवारी संध्याकाळी त्या तुरुंगात आपल्या पतीला भेटायला गेल्या होत्या. केजरीवाल यांना मधुमेह आहे, शुगरची पातळी ठीक नाही, ते खरे देशभक्त, निर्भय आणि धाडसी व्यक्ती आहेत. त्यांना दीर्घायुष्य, आरोग्य आणि यशासाठी शुभेच्छा. माझे शरीर तुरुंगात आहे पण आत्मा तुम्हा सर्वांमध्ये आहे, असेही त्यांनी सांगितले.

दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय नेते अरविंद केजरीवाल यांना कथित अबकारी घोटाळ्याप्रकरणी अटक केल्याचा निषेध करण्यासाठी मंगळवारी पणजी येथील आझाद मैदानावर जमलेल्या इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांना पोलिसांनी रोखले. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले; नंतर सर्व नेते, कार्यकर्त्यांना आझाद मैदानात प्रवेश देण्यात आला. तेथे इंडिया आघाडीने आपले शक्तिप्रदर्शन केले.

आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. आमची मागणी आहे की, अरविंद केजरीवाल भ्रष्ट असून त्यांनी दिल्लीची लूट केली असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR