32.6 C
Latur
Sunday, March 16, 2025
Homeमहाराष्ट्रअश्लील व्हीडीओ तयार करणा-या टोळीचा भांडाफोड

अश्लील व्हीडीओ तयार करणा-या टोळीचा भांडाफोड

परराज्यातील १३ तरुण-तरुणींना अटक

पुणे : प्रतिनिधी
पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या लोणावळ्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोणावळ्यात पर्यटकांना थांबण्यासाठी बांधण्यात आलेल्या बंगल्यांमध्ये अश्लील व्हीडीओ तयार केले जात असल्याचे उघड झाले आहे. हे अश्लील व्हीडीओ तयार करणा-या टोळीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली. या कारवाईनंतर लोणावळ्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

लोणवळ्यातील एका बंगल्यावर हा गोरख धंदा सुरू होता. पोलिसांनी अश्लील व्हीडीओ शूट करण्यासाठी लागणारा कॅमेरा आणि इतर साहित्य जप्त केले आहे. पोलिसांनी आरोपींकडून काही अश्लील व्हीडीओही जप्त केले आहेत. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तब्बल १३ जणांना अटक केली . महत्त्वाची बाब म्हणजे आरोपींमध्ये सर्व तरुणांचा सहभाग आहे.

भारतातील वेगवेगळ्या राज्यांतून हे सर्व तरुण लोणावळ्यात एकत्र आले होते. भारतात अश्लील व्हीडीओ बनवणे कायद्याने गुन्हा आहे. असे व्हीडीओ बनवण्यावर बंदी आहे. असे असतानाही लोणावळ्यातील एका बंगल्यात हा प्रकार सुरू होता. या सर्व आरोपींविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात भादंवि. कलम २९२, २९३, ३४, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ कायदा कलम ६७, ६७ (अ), स्त्रियांचे असभ्य प्रतिरुपन अधिनियम १९८६ कायदा कलम ३, ४, ६, ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR