23.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeसोलापूरसंकष्ट चतुर्थी दिवशीच भाजप उमेदवाराने मारला मटणावर ताव

संकष्ट चतुर्थी दिवशीच भाजप उमेदवाराने मारला मटणावर ताव

महायुतीच्या मेळाव्यात मांसाहारी जेवणावळी

सोलापूर : भाजपच्या माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी चक्क संकष्ट चतुर्थी दिवशीच मांसाहारी जेवणावळी बसवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे महायुतीच्या या मेळाव्यात स्वत: निंबाळकर यांनीही कार्यकर्त्यांसमवेत बसून मटणावर ताव मारला असल्याची चर्चा आता सुरू आहे.

गुरुवारी हिंदू धर्मात पवित्र मानली जाणारी संकष्ट चतुर्थी होती. हे माहीत असूनही या दिवशीच भाजप उमेदवाराने मांसाहारी जेवणाच्या पंगती बसविल्याने सांगोला विधानसभा आणि संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघातील हिंदुत्ववादी विचारांच्या मतदारांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

माढा लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. माढा लोकसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आतापासूनच लोकांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. मोहिते-पाटलांनी सांगोला तालुक्यात दोन दिवस कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्याने भाजपचे उमेदवार असलेले विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनीही सांगोला येथे महायुतीमधील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. सांगोला येथील हर्षदा लॉन्स येथे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासह शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजप पदाधिका-यांनी बैठक बोलावली होती.

या बैठकीत कार्यकर्त्यांनी सूचना आणि तक्रारी मांडल्या. मात्र, या बैठकीला जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे म्हणून कार्यकर्त्यांना चक्क मांसाहारी आणि शाकाहारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी महायुतीच्या अनेक कार्यकर्त्यांसह रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी मटणावर ताव मारला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR