सोलापूर : माढा लोकसभा मतदार संघात महायुतीने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महाविकास आघाडीने अजूनही उमेदवार जाहीर केलेला नाही. महायुतीमध्ये नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. माढा लोकसभामध्ये आता आणखी एक ट्विस्ट आला आहे, माढा लोकसभा मतदारसंघातून वंचितने रमेश बारसकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
वंचित बहुजन आघाडीने माझ्यावर विश्वास दाखवला आहे. माढा मतदारसंघात अनेक मुद्दे आहेत, शेतक-यांच्या मालाला भाव मिळत नाही, महिलांच्या हाताला काम नाही. तरुण मुलांची लग्नाचे वय झालेले असताना देखील लग्न होत नाहीत. हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्रातील आहे. या प्रश्नावर मी काम करणार आहे असेही वंचितचे रमेश बारसकर म्हणाले.
माढा मतदारसंघात एसी, ओबीसी, धनगर समाज मतदार आहेत. आता ओबीसी मतदार जागा झाला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील ओबीसी समाज पाठिंबा देईल ही अपेक्षा आहे असेही बारसकर म्हणाले. रमेश बारसकर म्हणाले, माढ्यात भाजपालाही फटका बसणार आहे. वंचितचा पहिला गुलाल माढा लोकसभा मतदारसंघातून असेल. प्रकाश आंबेडकर ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून जाहीर भूमिका घेतली आहे. ओबीसी समाज निवडणकीची वाट पाहत होता, आता येणा-या निवणुकीत ओबीसी समाजाची दाकत दाखवल्याशिवाय राहणार नाही असेही बारसकर म्हणाले.