28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयचकमकीत ८ नक्षलवादी ठार

चकमकीत ८ नक्षलवादी ठार

बस्तर : कोरचोली चकमकीत आतापर्यंत ८ नक्षलवादी ठार झाले आहेत. चकमक स्थळावरून ८ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. डीआरजी, सीआरपीएफ कोब्रा आणि बस्तर बटालियनच्या जवानांमध्ये अजूनही चकमक सुरू आहे. मंगळवारी सकाळी ६ वाजल्यापासून नक्षलवाद्यांसोबत जवानांची चकमक सुरू आहे. चकमकीत अनेक स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली.

कोरचोली चकमकीत ८ नक्षलवादी ठार झाले तर दुसरीकडे बिजापूर पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली आहे. चकमकीत ४ नक्षलवादी ठार झाल्याची बातमी आहे तर मोठ्या प्रमाणात नक्षलवादी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. गांगलूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोरचोली आणि लेंद्राच्या जंगलात चकमक सुरू आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांसोबत घटनास्थळावरून आयएनएसएएस, एलएमजी, एके-४७ सारखी स्वयंचलित शस्त्रेही जप्त करण्यात आली. पोलिस दल अजूनही जंगलात असून परिसरात शोध सुरू आहे.

नक्षलविरोधी अभियान तीव्र
गडचिरोली पोलिसांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षल विरोधी अभियान तीव्र केले आहे. कसनसूर चातगाव दलम आणि छत्तीसगडच्या औंधी दलमचे काही सशस्त्र कॅडर मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील चुटीनटोला गावाजवळ एमएच सीजी बॉर्डरवर तळ ठोकून असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिस आणि जवानांनी नक्षलविरोधी सर्च ऑपरेशन सुरु केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR