लातूर प्रतिनिधी :
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज बुधवार दि. ३ एप्रिल रोजी सायंकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चाकुर तालुका प्रमुख नंदकुमार पवार व लातूर उपजिल्हाप्रमुख अंगद पवारयांच्या चाकूर येथील लातूर – नांदेड रोडवरील संपर्क कार्यालयाला भेट देऊन उपस्थित महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी काँग्रेसचे अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक माजी महापौरविक्रांत गोजमगुंडे, अहमदपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. गणेश कदम, चाकूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विलास पाटील चाकूरकर, एन.आर.पाटील,चंद्रकांत मद्दे, निलेश देशमुख आदीसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.