लातूर : प्रतिनिधी
लातूरमधील सामान्य माणसाची परवडणारी चप्पल म्हणून बनसोडे यांच्या चप्पलला ओळखले जाते, गेली अनेक वर्ष या फुटवेअर व्यवसायात बनसोडे कुटुंबीय काम करुन ते लातूरचे नाव मोठे करत आहेत, असे सांगून राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बनसोडे कुटूंबियांना व्यवसाय वाढीसाठी शुभेच्छा दिल्या. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते शनिवार दि. ६ एप्रिल रोजी दुपारी लातूर शहरातील डॉ. आंबेडकर चौक परिसरातील अक्षय राजकुमार बनसोडे यांच्या एआरबी फुटवेअर होलसेल दालनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे, माजी महापौर दीपक सुळ, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, विलास को-ऑपरेटिव बँकचे व्हॉईस चेअरमन समद पटेल, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ, माजी नगरसेवक सचिन मस्के, विजयकुमार साबदे, युनूस मोमीन, विकास कांबळे, गणेश एसआर देशमुख, दीप्ती खंडागळे, सुमित खंडागळे, राजू गवळी, अकबर माडजे, बालाजी झिपरे, अभिषेक पतंगे, श्याम बरुरे, राज क्षीरसागर, इसरार पठाण, युसुफ शेख, अब्दुला शेख, युसुफ बाटलीवाला आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी बनसोडे कुटुंबीय मित्रपरिवार उपस्थित होते.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लातूरचा नावलौकिक वाढवण्याचे काम अक्षय बनसोडे करत आहेत. आमच्या आजोबांच्या काळापासून लातूर शहरात सामान्य माणसाला बनसोडे कुटुंबीय सेवा देत आहेत, त्यांनी रिटेल व्यवसायातून होलसेल व्यवसायात पदार्पण केले आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ही व्यवसाय करावा त्यासाठी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करु, अशी ग्वाही त्यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले की, सामान्य माणसाची परवडणारी चप्पल म्हणून बनसोडे यांच्या चप्पलला ओळखले जाते, गेली अनेक वर्ष फुटवेअर व्यवसायात बनसोडे कुटुंबीय काम करुन ते लातूरचे नाव मोठे करत आहेत, असे सांगून माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी बनसोडे कुटूंबियांना व्यवसाय वाढीसाठी शुभेच्छा दिल्या.
लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे हे लातूर शहरातील सुभाष चौक, बस स्टॅन्ड आणि आता ते श्यामनगरमध्ये त्यांच्या रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्ण सेवा करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाशी इमान राखणारे ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, भाजप सरकारचे ४०० पार आणि संविधानावर वार, असे धोरण आहे. याकरीता मतदारांनी जागरूकपणे मतदान करावे, या लोकसभा निवडणुकीमुळे देशात व राज्यात बदल होतील असेही त्यांनी सांगितले.
लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यावेळी बोलतांना म्हणाले की, लातूर शहरात सन १९८० पासून आंबेडकर चौक परिसरातुन मी जात असताना बनसोडे फुटवेअरची गर्दी पाहिली आहे, मी आता या होलसेल दुकानातून पहिली चप्पल खरेदी केली आहे. ग्राहकांनीही बनसोडे ब्रँडवर खूप प्रेम केले आहे, बनसोडे कुटुंबियांना व्यवसाय वाढीसाठी शुभेच्छा देतो असे सांगून त्यांनी लातूर लोकसभा निवडणुकीत हात चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.