लातूर : प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लातूर जिल्ह्याचे अधीक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क लातूर विभाग कारवाई करत राज्य उत्पादन शुल्क उदगीर विभागाने कासार शिरशी ते बडूर रोडच्या कडेला तालुका निलंगा, जिल्हा लातूर येथे अवैद्य देशी दारूचे दोन बॉक्स वाहतक करणारी दुचाकी चाकी १० किलोमिटर. पाठलाग करून पकडला. सदर कारवाईत दोन देशी दारूचे बॉक्स व दुचाकी चाकी मोटरसायकल असा ६६ हजार ७२० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई मध्ये उपाधीक्षक एम. जी. मुपडे, भरारी पथक धाराशिव लातूर, निरीक्षक आर. एम चाटे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश गोले, विक्रम परळीकर यांनी सहभाग घेतला.