21.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeलातूरजागृती शुगरचे ७ लाख मे. टन उसाचे गाळप

जागृती शुगरचे ७ लाख मे. टन उसाचे गाळप

लातूर : प्रतिनिधी
चालु गाळप हंगामात जागृती शुगर अँड अलाइंड इंडस्ट्रीज लिमिटेडने राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या अध्यक्षा तथा कार्यकारी संचालक सौ गौरवीताई अतुल भोसले देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ७ लाख २ हजार ३०९ मेट्रिक टन उसाचे यशस्वी गाळप केले असून कारखान्याने पूर्ण क्षमतेने कारखाना चालवून कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप ३१ मार्च अखेर पुर्ण केले आहे.
राज्यात उस उत्पादक शेतक-यांना एफ. आर. पी पेक्षा अधिक भाव देणा-या व खाजगी साखर उद्योगात भरारी घेत असलेल्या लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर अँड अलाईंड इंडस्ट्रीजच्या चालु गाळप हंगामातील सांगता समारोप कारखानास्थळी विधिवत पूजन कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी सांगता सोहळयास कारखान्याचे सरव्यवस्थापक येवले गणेश, रेणा साखर कारखान्याचे संचालक संभाजी रेड्डी, जागृती शुगरचे खाते प्रमुख आर. के. कदम, अतुल दरेकर, विलास पाटील, जी. पी. जाधव, एस. व्ही. वाकडे, लक्ष्मण बिराजदार यांच्यासह मालबा घोणसे अधिकारी, कर्मचारी, कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.
यावर्षी उसाचे गाळप सुरू असताना पावसाचे प्रमाण कमी तसेच अवर्षनग्रस्त परीस्थिती व उसाचे क्षेत्र वाढल्याने उस तोडणी लांबणीवर पडेल असे चित्र सगळीकडेच होते. मात्र जागृती शुगरचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी उस उत्पादक शेतक-यांना कार्यक्षेत्रातील उसाचे संपूर्ण गाळप मार्च अखेर पूर्ण करण्याच्या सूचना कारखाना प्रशासनास दिल्या होत्या. तसेच उस उत्पादक शेतक-यांना काळजी करू नका आपला सर्वांचा उस गाळप होईल असे आश्वस्थ केले होते. त्यादृष्टीने अत्यंत चांगले नियोजन करून कारखाना प्रशासनाने सर्व उस उत्पादक शेतक-यांच्या ऊसाचे गाळप ३१ मार्च अखेर गाळप पुर्ण करण्यात आले आहे. त्यामुळें जागृती शुगर कार्यक्षेत्रातील देवणी, शिरूर अनंतपाळ, निलंगा, उदगीर, चाकुर तालुक्यातील ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR