18.8 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रबीडमध्ये वंचितचे ‘कुणबी मराठा कार्ड’

बीडमध्ये वंचितचे ‘कुणबी मराठा कार्ड’

आंबेडकरांनी केली उमेदवाराची घोषणा

बीड प्रतिनिधी : बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अशोक हिंगे यांना बीडमधून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. अशोक हिंगे यांच्या रुपाने कुणबी मराठा चेहरा प्रकाश आंबेडकर यांनी बीड लोकसभेच्या रिंगणात उतरवला आहे. बीडच्या उमेदवारीसंदर्भात वंचितकडून पत्र जारी करण्यात आले आहे. अशोक हिंगे यांनी मराठा क्रांती मोर्चामध्ये देखील समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.

वंचित बहुजन आघाडीकडून बीडमध्ये अशोक हिंगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर महायुतीकडून भाजप नेत्या पंकजा मुंडे या बीड लोकसभेच्या रिंगणात आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बजरंग सोनवणे यांना लोकसभेचे तिकिट देण्यात आले आहे. त्यामुळे आता अशोक हिंगे यांच्यासमोर बीडमध्ये बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांचे मोठे आव्हान असणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR