29.4 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeमहाराष्ट्रसुळेंचे प्रचारप्रमुख प्रवीण माने अजित पवार गटात

सुळेंचे प्रचारप्रमुख प्रवीण माने अजित पवार गटात

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात आज हाय होल्टेज ड्रामा होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचे प्रचारप्रमुख असलेले जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) जाणार असल्याचे बोलले जाते. प्रवीण माने याबाबत आज आपली भूमिका मांडणार आहेत.

दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माने यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. प्रवीण माने हे सुप्रिया सुळे यांचे इंदापूर तालुक्यातील प्रचारप्रमुख आहेत.
शरद पवार गटाच्या सर्व निवडणुका माने यांच्या नेतृत्वाखाली होणार अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जाहीर करण्यात आले होते. माने जर अजित पवार गटात सहभागी झाले तर सुप्रिया सुळे यांना तो मोठा धक्का असेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

काही दिवसांपूर्वी सुळे यांच्या प्रचारार्थ कोपरा बैठकांचे आयोजन केले होते, मात्र अचानक शरद पवारांच्या सभेला प्रवीण माने व त्यांचे वडील दशरथ माने उपस्थित नव्हते, तेव्हापासून इंदापूर तालुक्यात माने अजित पवार गटात प्रवेश करतील, अशा चर्चा सुरू आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR