29.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्र‘तारिफ पे तारिफ’

‘तारिफ पे तारिफ’

पुणे : कोरोनाकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले काम जगभर पोहोचले आहे. मात्र, राज्यात त्यावेळी मोदींवर घरात बसून टीका करण्यात आली. मोदी त्याकडे लक्ष देत नव्हते. मात्र, मोदींनी वक्रदृष्टी केल्यास काय होईल? फेसबुकवरून लाइव्ह करणा-यांच्या तोंडाला फेस येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. दरम्यान शिंदेंकडून वारंवार मोदींची तारिफ पे तारिफ सुरू असल्याचे बोलल्या जात आहे.

पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे, पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, शिरूरमधील शिवाजीराव आढळराव पाटील उपस्थित होते. तत्कालीन आघाडी सरकारमध्ये विकास कामे होत नसल्यानेच लोकांच्या मनातील युती सरकार स्थापन केले. विकासाचे व्हिजन लक्षात घेऊनच अजित पवारदेखील युतीत सामील झाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR