मुंबई : महाराष्ट्रात तीन पक्ष आमच्या विरोधात आहेत. एक आहे नकली शिवसेना, दुसरी आहे नकली राष्ट्रवादी आणि एक अर्धीमुर्धी काँग्रेस पार्टी. यामुळे लवकरच दुध का दुध पाणी का पाणी होईल. उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष अर्धा राहिला. शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष अर्धा झाला. या दोघांनी काँग्रेसलाही अर्धे करुन टाकले. हे अर्धवट पक्ष महाराष्ट्राचे भले करु शकतात?, अशी विचारणा अमित शाह यांनी सभेत केली. निवडणूक झाली की मतभेदांनीच ही आघाडी फुटून जाईल.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे केंद्रातील नेते राज्यात प्रचाराला येण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर अमित शाह यांची राज्यात सभा झाली. तसेच भाजपाचे अन्य नेते, मंत्री, अन्य राज्यातील मुख्यमंत्री महाराष्ट्रात प्रचार करताना दिसत आहेत. अमित शाह यांनी या सभेत महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडले. या टीकेचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला.