29 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रजळगाव एमआयडीसीत आग्नितांडव, अनेक कर्मचारी जखमी

जळगाव एमआयडीसीत आग्नितांडव, अनेक कर्मचारी जखमी

मोरया केमिकल कंपनीतील घटना

जळगाव – येथील एमआयडीसीतील मोरया ग्लोबल कंपनीसह केमिकलच्या दोन कंपन्या बुधवारी सकाळी आठच्या सुमारास आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. यावेळी कंपनीतून विविध प्रकारचे स्फोट होत असल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे. दोन कंपन्यांमध्ये ही आग भडकली असून आठ जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

घटनेत करण जगबिर संधू (वय २०, रा. अमरावती) आणि उमेश जगदीश कोळी (वय ३०, रा. यावल) हे दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनास्थळी जळगाव महानगरपालिका व इतर अग्निशमन दलाचे बंब दाखल होत असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल असून नागरिकांच्या मदतीने मदत कार्य करीत आहेत. दरम्यान आग ही शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून दोन्ही कंपन्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे.

कंपनीत आठ महिला व काही कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यात जळगाव तालुक्यातील आव्हाने गावातील तीन जणांचा समावेश आहे. त्यापैकी मंगल पाटील याला बाहेर काढण्यात आले आहे. समाधान नारायण पाटील हा युवक मध्ये अडकला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR