23.7 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रपरळीत ट्रॅक्टर उलटून भीषण अपघात; दोन कामगारांचा मृत्यू

परळीत ट्रॅक्टर उलटून भीषण अपघात; दोन कामगारांचा मृत्यू

परळी : विद्युतवाहिनीसाठीचे सिमेंट पोल घेऊन जाणारे ट्रॅक्टर धर्मापुरी रस्त्यावर मंगळवारी रात्री उलटले. या दुर्घटनेमध्ये ट्रॅक्टरमधील सिमेंट पोल अंगावर पडल्याने त्याखाली दबून भोजनकवाडी येथील दोन कंत्राटी कामगारांचा जागीच मृत्यू झाला.

याबाबतची माहिती अशी की, मंगळवारी रात्री धर्मापुरी येथून पाच मजूर एका ट्रॅक्टरमधून विद्युतवाहिनीसाठीचे सिमेंटचे पोल घेऊन भोजनकवाडीकडे जात होते. धर्मापुरी रस्त्यावरील कॉलेजजवळील उतारावर अचानक ट्रॅक्टर उलटला. काही कळायच्या आत ट्रॅक्टरमधील मजुरांच्या अंगावर सिमेंटचे पोल पडले. अवजड पोलखाली दबल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले. प्रल्हाद वैजनाथ फड व भाऊसाहेब माणिक केदार (दोघे राहणार भोजनकवाडी) अशी मृत्यू पावलेल्या कामगारांची नावे आहेत.

दरम्यान, माहिती मिळताच परळी ग्रामीणचे पोलिस निरीक्षक मनीष पाटील, एपीआय जाधव, नवनाथ हरगावकर, सुनील अन्नमवार यांनी अपघातस्थळी भेट देऊन मदत कार्य केले. तिन्ही जखमींना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघातानंतर ट्रॅक्टरचालकाने घटनास्थळावरून पळ काढला असल्याचे समजते. दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याने भोजनकवाडीमध्ये शोककळा पसरली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR