नवी दिल्ली : माजी खासदार आणि भाजपचे उमेदवार कुंवर सर्वेश स्ािंग (७२) यांचे दिल्लीतील एम्समध्ये उपचारादरम्यान निधन झाले. ते अनेक दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पक्षात शोककळा पसरली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना भारतीय जनता पक्षाकडून तिकीट देण्यात आले होते.
भाजपचे जिल्हा मीडिया प्रभारी संजय ढाका यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सर्वेश सिंग यांच्या मृत्यूची माहिती दिली. लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारीच मुरादाबादमध्ये मतदान झाले. कुंवर सर्वेश यांचा जन्म २३ डिसेंबर १९५२ रोजी झाला. त्यांचे मूळ गाव ठाकूरद्वाराचे रतुपुरा आहे. सर्वेश सिंग यांना राजकारणाचा वारसा लाभला होता. त्यांचे वडील राजा रामपाल सिंग हे काँग्रेसचे होते आणि ते ठाकुरद्वारातून ४ वेळा आमदार राहिले आहेत.