20.8 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeक्रीडादिल्लीला नमवून हैदराबाद गुणतालिकेत दुस-यास्थानी

दिल्लीला नमवून हैदराबाद गुणतालिकेत दुस-यास्थानी

दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ही फलंदाजांची लीग होऊ लागली आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर आजही ४५० हून अधिक धावा संघांनी कुटल्या. सनरायझर्स हैदराबादचे वादळ रोखणे दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनाही नाही जमले. कुलदीप यादवने ४ विकेट्स घेऊन वादळाचा वेग किंचित मंद केला, परंतु दिल्ली समोर तगडे लक्ष्य उभे राहिले. दिल्लीच्या २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कच्या वादळाने हैदराबादचे टेंशन वाढवले होते. रिषभ पंतनेही चांगले फटके खेचले, परंतु दिल्लीला विजय मिळवून देण्यासाठी ते पुरेसे नाही ठरले. टी नटराजनने १९ धावांत ४ विकेट्स घेतल्या.

२२ वर्षीय खेळाडूने हैदराबादला वेड लावले, दिल्लीकडून वेगवान अर्धशतक ठोकले
दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात चांगली झाली नसली तरी २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कने वादळी फटकेबाजी करून सनरायझर्स हैदराबादचे टेंशन वाढवले होते. त्याने दिल्लीकडून आयपीएल इतिहासातील सर्वांत वेगवान व एकंदर तिसरी जलद फिफ्टि ठोकली. डेव्हिड वॉर्नरला (१) आज अपयश आले. पृथ्वी शॉ याने ५ चेंडूंत १६ धावा केल्या, परंतु वॉशिंग्टन सुंदरने त्याची विकेट घेतली. जॅक फ्रेझर-मॅकगर्क व अभिषेक पोरेल यांनी दिल्लीचा डाव सावरला आणि ३० चेंडूंत ८४ धावा चोपल्या. जॅक १८ चेंडूंत ५ चौकार व ७ षटकारांसह ६५ धावांवर माघारी परतला. पाठोपाठ अभिषेकही २२ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ४२ धावांत माघारी परतला, मयांक मार्कंडेने चतुराईने त्याला केले.

कर्णधार पॅट कमिन्सने गोलंदाजीत योग्य बदल केल्याचा हैदराबादला फायदा झाला. नितिश रेड्डी व टी नटराजन यांनी अनुक्रमे त्रिस्तान स्तब्स ( १०) व ललित यादव ( ७) यांना बाद करून दिल्लीची अवस्था ६ बाद १६६ अशी केली. त्यांना ३० चेंडूंत १०१ धावा करायच्या होत्या. रिषभ पंत आणि अक्षर पटेल ही जोडी त्यांची शेवटची आशा होती. पटेल ( ६) नटराजनच्या फुलटॉसवर झेलबाद झाला. त्याच षटकात नटराजनने दिल्लीच्या एनरिच नॉर्खियाचा त्रिफळा उडवला आणि कुलदीप यादवला पायचीत केले. नटराजनने ४ षटकांत १९ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या आणि ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली. नितिश रेड्डीने दिल्लीचा दहा फलंदाज १९९ धावांवर माघारी पाठवला आणि हैदराबादने ६७ धावांनी सामना जिंकला. रिषभ ४४ धावांवर बाद झाला. हा विजय मिळवून हैदराबाद १० गुणांसह दुस-या क्रमांकावर पोहोचला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR