31 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रमंडलिक-शाहू महाराज समर्थकांंमध्ये ‘सोशल वॉर’

मंडलिक-शाहू महाराज समर्थकांंमध्ये ‘सोशल वॉर’

कोल्हापूरची निवडणूक सोशल मीडियावरही तापली

कोल्हापूर : ‘निष्क्रिय खासदार उत्तर द्याच !,’ ‘….यावर हा घ्या पुरावा…’ अशा पद्धतीने सोशल मीडियावर थेट आरोप-प्रत्यारोप आता सुरू झाले आहेत. एवढेच काय तर खासदारांनी खुलासा केल्यानंतर…खुल्या चर्चेसाठी महाराज स्वत: येणार काय? असाही प्रतिप्रश्­न पुढे आला आहे. रस्त्यावर, गल्ली-बोळांत, वाडी-वस्तीत ज्या पद्धतीने निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे, तशीच निवडणूक आता कोल्हापूरच्या सोशल मीडियावरही तापली आहे.

दरम्यान, निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप हे ठरलेलेच असते. त्यानंतर गुन्हे दाखल होऊन पेटलेला वाद थेट न्यायालयाच्पर्यंत जातो. हे अनेकवेळा सर्वांनी पाहिले आहे. यामध्ये आता सोशल मीडियाने भर घातली आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांच्या समर्थकांकडून आरोप-प्रत्यारोपांची फैरी झडल्या जात आहेत. रोज एक प्रश्­न घेऊन महायुतीच्या विद्यमान खासदारांना छेडण्याचा प्रयत्न याच सोशल मीडियावर होत आहे. यामध्ये संजय मंडलिकांना उद्देशून निष्क्रिय खासदारांनी उद्योगांसाठी काय केले? असा प्रश्­न उपस्थित केला आहे. त्यावर मंडलिक समर्थकांकडूनसुद्धा हा घ्या पुरावा म्हणून आजपर्यंत केलेल्या पाठपुराव्याची माहिती, पत्रव्यवहारासह उत्तरात दिली आहे. एवढेच नव्हे; तर खुल्या चर्चेसाठी महाराज स्वत: येणार काय? असाही प्रतिप्रश्­न केला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवार स्वत: आणि त्यांचे कुटुंबीयसुद्धा कशा पद्धतीने प्रचारात सक्रिय झाले आहेत, याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल केली जात आहे. रिल, स्टोरीसुद्धा पाहण्यास मिळत आहेत. नुकताच मधुरिमाराजे यांनी लहान मुले क्रिकेट खेळ असताना प्रचारादरम्यान त्यांच्यामध्ये जाऊन जोरदार बॅंिटग केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. संजय मंडलिकांचे पुत्र वीरेंद्र मंडलिकसुद्धा कोणकोणत्या गावांत जाऊन प्रचार करीत आहेत, तेथे कसा प्रतिसाद मिळत आहे, त्याची रिल, स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR