30.7 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिक अग्नितांडवात ७० पेक्षा अधिक वाहने जळून खाक

नाशिक अग्नितांडवात ७० पेक्षा अधिक वाहने जळून खाक

नाशिक : नाशिक शहरात भीषण आग लागली असून यात अनेक घरे जळून खाक झाल्याचे समोर येतंय. दुचाकीच्या दुकानाला ही आग लागल्यानंतर शेजारच्या गोडाऊनमध्ये पसरली. त्यानंतर घरांनाही आगीने घेरले.

नाशिकच्या जुने नाशिक भागात आज सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास दुचाकी वाहन खरेदी विक्री गोदाम आणि घरांना आग लागली. या आगीत ७० पेक्षा अधिक दुचाक्या जळून खाक झाल्या. अग्निशामक दलाच्या दहा बंबांनी ही आग आटोक्यात आणली. सुदैवानं या आगीत कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. सकाळी साडेसात वाजता, जुन्या नाशिकमधील चौक मंडल इथे आग लागल्याची घटना कळवली. यावेळी वाहनाचे गॅरेजला आग लागली. त्यामुळे चप्पलचे गोडाऊन आणि चार घरांना आग लागली. त्याला खेटून आग इतर परिसरात आग पसरली. सध्या नाशिकमधील सहा अग्निशमन दलाचे ९ बंब घटनास्थळावर कार्यरत आहेत. सध्या आग कशाने लागली, याबाबत तपास सुरू आहे. माहिती घेतल्यानंतर आगीचं नेमकं कारण काय आहे, याबाबत सविस्तर माहिती कळेल.

नाशिकच्या जुने नाशिक भागात आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास भीषण आगीची घटना घडली. या भागात असलेल्या दुचाकी वाहन खरेदी विक्रीच्या गोदामाला अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की यात रशीद खान यांच्या मालकीच्या गोदामामधील ७० हून अधिक दुचाक्या पूर्णत: जळून खाक झाल्या. यानंतर आगीने रौद्ररुप धारण केले आणि गोदामाच्या मागच्या बाजूस असलेली तीन घरे यात जळून खाक झाली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली, तरी यात करोडो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र ही आग कशामुळे लागली, याची अद्याप माहिती मिळू शकली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR