24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeलातूरनाथजोगी समाजातील ८७ मुलांनी घेतली नाथदिक्षा

नाथजोगी समाजातील ८७ मुलांनी घेतली नाथदिक्षा

लातूर : प्रतिनिधी 
अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ, गोरक्षनाथ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने पवित्र नाथदिक्षा (कानचिरा) सामुहिक कार्यक्रम लातूर येथील श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर देवस्थानात रविवार दि. १२ मे रोजी पार पडला. यामध्ये ८७ मुलांनी विधीवत पूजा केली व  धर्मगुरुंनी त्यांना नाथदिक्षा दिली.
यावेळी अखिल भारतीय समाज महासंघाचे छत्रपती संभाजी नगरचे अध्यक्ष सोमनाथ धायडे, ह. भ. प. भरत महाराज जोगी, जालिंदर महाराज शिरोळकर, भरत चव्हाण, ज्ञानेश्वर महाराज, बालकनाथ यादव, डॉ.पैठणकर, राजेंद्र देवगण, संतोष चव्हाण, डॉ. गजानन चव्हाण, हरिभाऊ गायकवाड व राजेश भांडे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी  माधव क्षीरसागर, दत्तात्रय सूर्यवंशी, अमोल चव्हाण, धर्मनाथ रिद्दिवाडे, जगन्नाथ कदम, गुरुनाथ मधूरकर, शंकर चव्हाण, परमेश्वर गायकवाड , रवी पवार, प्रेमनाथ चव्हाण, सुधीर जाधव, संतोष रोकडे, सिद्धनाथ रिद्दिवाडे, अमोल गायकवाड, नागनाथ जोगी, धनुनाथ नाथजोगी, लहु जाधव, विवेकानंद योगी, प्रमोद पवार,किरण सुर्यवंशी, बालाजी चव्हाण,बाळू सूर्यवंशी, गहिनीनाथ क्षीरसागर, रामनाथ जाधव, गोपिनाथ मधूरकर, विठ्ठलनाथ केदारनाथ चव्हाण आदींनी पुढकार घेतला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR