24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयपंतप्रधान मोदींनी दाखल केला उमेदवारी अर्ज

पंतप्रधान मोदींनी दाखल केला उमेदवारी अर्ज

वाराणसी : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून तिस-यांदा लोकसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे अनेक बडे नेते उपस्थित होते. यावेळी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ५२ हजार रुपये रोख असल्याचे नमूद केले आहे. त्यांच्याकडे ना घर आहे ना जमीन, ना कार आहे. या स्थितीत त्यांची एकूण संपत्ती ३ कोटी २ लाख ६ हजार ८८९ रुपये आहे.

मोदींच्या नावे स्टेट बँकेत दोन खाती आहेत. यापैकी एक खाते गुजरातच्या गांधीनगरमध्ये आहे आणि दुसरे खाते वाराणसीच्या शिवाजी नगर शाखेत आहे. पंतप्रधान मोदींच्या गुजरात बँक खात्यात ७३ हजार ३०४ रुपये आणि वाराणसीच्या खात्यात फक्त ७ हजार रुपये आहेत. पीएम मोदींची एसबीआयमध्ये २ कोटी ८५ लाख ६० हजार ३३८ रुपयांची एफडी आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये ९ लाख १२ हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. याशिवाय जंगम मालमत्तेत सोन्याच्या ४ अंगठ्या आहेत, ज्यांचे एकूण वजन ४५ ग्रॅम असून त्याची किंमत २ लाख ६७ हजार ७५० रुपये आहे.

निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी शैक्षणिक पात्रतेचीही माहिती दिली. त्यानुसार पीएम मोदींनी १९६७ मध्ये गुजरात बोर्डातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर १९७८ मध्ये त्यांनी दिल्ली विद्यापीठातून बॅचलर ऑफ आर्टस केले. त्यानंतर १९८३ मध्ये गुजरात विद्यापीठातून मास्टर्स ऑफ आर्टस् केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR