31 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeधाराशिवगेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.....

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी…..

कळंब : सतीश टोणगे
निवडणूक म्हटली की, प्रत्येक व्यवसायाला अच्छे दिन येतात. त्यात फ्लेक्स, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी हॉटेल, लॉज धाबे आणि चहा नाश्ता किरकोळ व्यवसायिकासह वाहनधरकाना सुद्धा काही ना काही कामाची उपलब्धता झाली होती, निवडणुकीची धामधूम संपली आणि गर्दी ओसरली. लहान व्यवसायिकाना या काळात चांगली कमाई झाली होती.

निवडणुकीच्या कालावधीत या सर्वच व्यवसायिकांची भरभराट होते. निवडणुका संपल्यामुळे व्यवसायिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याची स्थिती दिसून येत आहे. लोकसभा निवडणूकिची घोषणा झाली आचारसंहिता सुरू झाली. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अर्ज सादरीकरण ते प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यात शहर आणि जिल्ह्यात विविध व्यवसायांसाठी समाधानकारक स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी काही ठिकाणी उमेदवाराकडून प्रचार कार्यालय स्थापन करण्यात आले, सोबतच उमेदवाराकडून प्रचारासाठी वाहने निश्चित करण्यात आली. या वाहनासाठी दररोज लागणारे इंधन खर्च चालकाचा खर्च वाहनाची प्रति दिवसाची खर्चाची जबाबदारी अशा बाबी केल्या जात होत्या. त्यावेळी अनेकांच्या हाताला काम मिळाले शिवाय प्रचारासाठी वेगवेगळ्या प्रकारचे वाहने निश्चित केली गेली होती. यात ऑटो रिक्षा, आपे रिक्षा, मोटारसायकल यांनीही विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.सोशल मीडिया, डिजिटल माध्यमाचा प्रचार सुद्धा केला जात होता. त्यामुळे व्हिडिओग्राफी फोटोग्राफी डिजिटल बॅनर फ्लेक्स होल्डिंग प्रचारासाठी पॉम्पलेट तयार केले जात होते. त्यामुळे त्यावेळी प्रत्येकाला दररोज काही ना काही काम दिले जात होते. मात्र आता निवडणूक प्रक्रिया संपल्यामुळे या व्यवसायाकडे निवडणुका असतील प्रचार आणि अन्य यंत्रणा उमेदवाराचे प्रतिनिधी येत नसल्याने, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी…..असे म्हणण्याची वेळ आली आहे.

निवडणुका म्हणजे सुगीचा काळ
लोकसभा निवडणूक झाली, मात्र आगामी काळात विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कधी लागतील या वर चर्चा होऊ लागली आहे. निवडणुका म्हणजे सर्वांसाठी सुगीचा काळ असतो त्यामुळे या कालावधीत वेगवेगळी कामे उपलब्ध होतात, त्यातून आर्थिक फायदा सुद्धा होत असतो. प्रशासनाच्या दृष्टीने तयारीमध्ये लागणा-या मंडप, केटंिरग ला चांगले दिवस आले होते.या मुळे तरुण वर्गाला मोठ्या प्रमाणावर काम मिळाले होते.पण आता सारे शांत झाल्याची कुजबूज होऊ लागली आहे. मतमोजणी नंतरच पुन्हा काही दिवस चांगले दिवस येतील अशी आशा ,लहान लहान व्यापारी वर्गांना वाटत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR