22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
HomeFeaturedपुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांना जामीन

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांना जामीन

 

पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांना अखेर जामीन मंजूर झाला. मुंबई हायकोर्टाने हा जामीन मंजूर केला. एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर भोसले यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. सीबीआयच्या एका खटल्यात त्यांना हा जामीन देण्यात आला. पण आणखी एका प्रकरणात त्यांना जामीन होणे बाकी आहे.

अविनाश भोसले हे जवळपास दोन वर्षापासून कोठडीत आहेत. येस बँक आणि डीएचएफएल घोटाळा प्रकरणात २६ मे रोजी त्यांनी पहिल्यांदा सीबीआयने अटक केली होती. चुकीच्या पद्धतीने काही कर्ज दिल्याचा आरोप अविनाश भोसले यांच्यावर आहे. तर दुसरीकडे मनी लाँडिंÑगच्या आरोपाखाली ईडीकडून देखील त्यांचा तपास सुरु आहे.

साधारण वर्षभरापूर्वी अविनाश भोसले यांनी हायकोर्टात जामिनासाठी धाव घेतली होती. पण हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळली होती. त्यानंतर आज त्यांना सीबीआयच्या प्रकरणात हायकोर्टाने जामीन मंजूर केला. पण अद्याप ईडीच्या प्रकरणात त्यांना दिलासा मिळाला नसल्याने त्यांची तुरुंगातून सुटका होते की नाही याकडे सा-यांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR