22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूरखुडूस ग्रामपंचायतीवर पाण्यासाठी महिलांचा चक्क घागर मोर्चा

खुडूस ग्रामपंचायतीवर पाण्यासाठी महिलांचा चक्क घागर मोर्चा

अकलूज: तालुक्यातील खुडूस ग्राम पंचायतीवर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांनी चक्क घागर मोर्चा काढला. पाणी द्या पाणी असा महिलांचा आक्रोश पाहवयास मिळाला.

खुडूस हे संत ज्ञानेश्वर पालखी महामार्गावर असून, दहा ते बारा हजार लोकसंख्या आहे. अनेक वाड्या-वस्त्याशी निगडीत आहे. दोन-तीन महिन्यांपासून पाणी मिळत नाही. याबाबत ग्राम पंचायतीला लेखी निवेदन दिले. तरीदेखील दखल घेतली नाही.

यामुळे मोर्चा काढण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्या पल्लवी साठे, रेखा चोरमले, छबा साठे, लता साठे, सुंदर तुपे, राणी भोपळे, सविता सकट, कल्पना भोपळे, मनीषा सुरवसे, सारिका काटे,शीतल मोटे, आशा भोसले, शैला मिसाळ, रेश्मा सुरवसे, राजाबाई कांबळे, उज्ज्वला लोखंडे, विमल कुंभार, सविता सुरवसे, योगेश ठवरे, हनुमंत ठवर यांच्यासह म हिला सामील झाल्या होत्या.
गेली कित्येक दिवस झाल गावात पाणी नाही. आमचे हातावरचे पोट आहे. कामावर जाण्याऐवजी पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. याकडे ग्रामपंचायत गांभिर्याने घेत नाही. पाणी मिळत नाही तोपर्यंत गावातील आम्ही सर्व माहिला ग्रामपंचायत उघडू देणार नाही. कार्यालयासमोर माहिला आमरण उपोषणास बसणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR