28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रमहिलेचा भरधाव गाडीने चिरडल्याने मृत्यू, सायन हॉस्पिटलच्या डीनला अटक

महिलेचा भरधाव गाडीने चिरडल्याने मृत्यू, सायन हॉस्पिटलच्या डीनला अटक

मुंबई : पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणानंतर राज्यात अनेक ठिकाणी अपघातांची मालिकाच पाहायला मिळत आहे. मुंबईत सायन हॉस्पिटलचे डीन राजेश डेरेंच्या कार धडकेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सायन हॉस्पिटसलच्या गेट नंबर सातवर शुक्रवारी रात्री 8.30 वाजता हा अपघात घडला. मात्र अपघाताच्या 14 तासांनंतर डीनकडून याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. दरम्यान अपघाताप्रकरणी राजेश डेरेंविरोधात गुन्हा दाखल झाला असून सायन पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

रुबेदा शेख (वय 60) असं मृत झालेल्या महिलेचं नाव असून त्या शुक्रवारी सायन रुग्णालयातून उपचार घेऊन घरी निघाल्या होत्या. त्याचवेळी सायन हॉस्पिटलचे डीन डॉ. राजेश डेरेंच्या निष्काळजीमुळे त्या महिलेचा मृत्यू झाला. राजेश डेरे यांच्या विरोधात सायन पोलिसांनी कलम 304 अ, 338, 177, 279, 184, 203 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR