28.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeमनोरंजन२७ मे पासून भेटीला येतेय नवी मालिका ‘येड लागलं प्रेमाचं’

२७ मे पासून भेटीला येतेय नवी मालिका ‘येड लागलं प्रेमाचं’

मुंबई : स्टार प्रवाह म्हणजे महाराष्ट्राची पहिली पसंती. स्टार प्रवाह वाहिनीने प्रेक्षकांना भावतील आणि दैनिंदिन आयुष्याचा भाग वाटतील अशा मालिकेच्या कथा आणि घरातील सदस्य वाटावीत अशी पात्र अभी करून रसिकांचं भरभरून मनोरंजन केले आहे. मनोरंजनाचा हा प्रवास असाच अखंडित ठेऊन नव्या मालिकांची पर्वणी स्टार प्रवाह वाहिनी घेऊन येत आहे. घरोघरी मातीच्या चुली आणि साधी माणसं नंतर स्टार प्रवाहवर सुरू होतेय नवी मालिका येड लागलं प्रेमाचं माणसाला अंतर्बाह््य बदलून टाकतं ते प्रेम. प्रेमात समोरच्याला बदलण्याचा अट्टाहास नसतो. जे जस आहे ते अगदी तसं त्याच्या पूर्ण गुण-दोषांंसकट स्वीकारणं म्हणजे प्रेम.

येड लागलं प्रेमाचं ही मालिकाही प्रेमातल्या वेड्यापणाला साथ देणारी असेल. महाराष्ट्राचे कुलदैवत असणा-या विठुरायाच्या पंढरी नगरीत या मालिकेची गोष्ट घडणार आहे. राया आणि मंजिरी या मालिकेतील प्रमुख पात्र. एकमेकांचा तिरस्कार करणा-या राया आणि मंजिरीचा पे्रमात पडण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे येड लागलं प्रेमाचं ही मालिका.

अभिनेता विशाल निकम, स्वाभिमान मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री पुजा बिरारी, लोकप्रिय अभिनेता जय दुधाणे या मालिकेत राया, जय आणि मंजिरीची भूमिका साकारताना दिसतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR