22.8 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयराकेश दौलताबाद यांच्या निधनामुळे हरियाणा सरकार आले अल्पमतात

राकेश दौलताबाद यांच्या निधनामुळे हरियाणा सरकार आले अल्पमतात

नवी दिल्ली : हरियाणातील बादशाहपूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार राकेश दौलताबाद यांचे शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दौलताबाद यांच्या निधनामुळे हरियाणातील भाजपला मोठा धक्का बसला असून, राज्यातील नायब सिंह सैनी सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. अपक्ष आमदार राकेश दौलताबाद यांच्या निधनापूर्वीच हरियाणा सरकार अल्पमतात चालत होते. दरम्यान आता नायबसिंग सैनी सरकारपुढे बहुमताचा आकडा गाठणे मोठे आव्हान बनले आहे.

बहुमताच्या आकड्यात अडकलेल्या भाजप सरकारला अपक्ष आमदार दौलताबाद यांचा पाठिंबा होता. त्यांच्या निधनाने विधानसभेच्या ९० जागांपैकी सदस्यांची संख्या आता ८७ झाली आहे. यानुसार बहुमताचा आकडा ४४ असेल. सत्तेत असलेल्या भाजपकडे स्वत:चे ४० आमदार आहेत. याशिवाय भाजपला हलोपाचे सदस्य आणि पृथलाचे अपक्ष आमदार नयनपाल रावत यांचा पाठिंबा आहे. या आमदारांसह भाजपची सदस्य संख्या ४२ वर पोहोचली आहे. अशा स्थितीत त्यांना बहुमतासाठी आणखी दोन आमदारांचा पाठिंबा लागणार आहे.

जेजेपीचे आमदार ठरणार पुन्हा गेम चेंजर

या सर्व परिस्थितीत भाजपला जेजेपीच्या बंडखोर आमदारांकडूनच पाठिंब्याची आशा आहे. अलीकडेच जेजेपीचे तीन आमदार आणि भाजपचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल यांच्यासोबत गुप्त बैठकही झाली. त्यावेळी जेजेपीचे बंडखोर आमदार देवेंद्र बबली आणि इतर दोन आमदार तिथे होते. पण लोकसभा निवडणुकीच्या वेळी बबलीने काँग्रेसला पाठिंबा देऊन नवी अडचण निर्माण केली आहे, दरम्यान, जेजेपीचे आणखी एक आमदार रामकुमार गौतम यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देऊन हरियाणा सरकारच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR