28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयमतपेटीत कैद झाले पूर्वाश्रमीच्या पती-पत्नीचे भविष्य

मतपेटीत कैद झाले पूर्वाश्रमीच्या पती-पत्नीचे भविष्य

विष्णुपुरी : विष्णुपुरी मतदारसंघातील निवडणूक देशामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. या मतदारसंघामध्ये पूर्वाश्रमीचे पती-पत्नी असणारे सौमित्र खान विरुद्ध सुजाता मंडल यांच्यात लढत होत आहे. सौमित्र भाजपचे उमेदवार तर, सुजाता या तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार आहेत. एकमेकांच्या विरोधात उमेदवार म्हणून असलेल्या या उमेदवारांची प्रेम कहाणी, लग्न आणि घटस्फोट हा प्रवास मोठा रंजक आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमधील निवडणूक तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप अशी होत आहे. पश्चिम बंगालमध्ये दीदीची गॅरंटी चालणार की मोदी गॅरंटीची हवा असणार हे चार जूनलाच कळेल. मात्र, सहाव्या टप्प्यात पश्चिम बंगालमधील सौमित्र हे २०१० मध्ये काँग्रेसमध्ये होते त्यावेळी त्यांची ओळख सुजाता यांच्याशी झाली. सुजाता या एका सरकारी शाळेमध्ये शिक्षिका होत्या.

दोघांच्याही ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. पुढे सौमित्र यांनी काँग्रेसला रामराम करत २०१४ मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. घरच्यांच्या विरोधात जाऊन दोघांनीही २०१६ मध्ये लग्न केले. लग्नानंतर सौमित्र यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत सुजाता या देखील भाजपमध्ये गेल्या. सौमित्र २०१९ ची निवडणूक भाजपकडून लढले. मात्र, पुढे दोघांमध्ये खटके उडू लागले. सुजाता यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सौमित्र यांनी सुजाता यांच्याशी घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR