28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeलातूरवीज कोसळून तीन शेतकरी, पाच म्हशी दगावल्या

वीज कोसळून तीन शेतकरी, पाच म्हशी दगावल्या

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयात वादळी वाऱ्यासह पाऊस लातूर जिल्हयात रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारच्या सुमारास जिल्हयात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरोबरच विजांच्या कडकडाटाने तीन शेतकऱ्यांचा व पाच म्हैशीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नैसर्गीक आपत्तीच्या कहरमुळे शेतकऱ्यांचे जिवीत व आर्थिक मोठे नुकसान झाले आहे.

चाकुर तालुक्यातील महाळंगी येथे रविवारी दुपारी चार वाजता वीज पडून शिवाजी नारायण गोमचाळे अंदाजे (वय ३५ वर्षे) व ओम लक्ष्मण शिंदे (वय ३० वर्षे) याचा मृत्यू झाला आहे. तसेच शिवनखेड येथील प्रभू रामा कोपले यांची म्हेस झाडाखाली बांधली असता वीज कोसळून मयत झाली आहे. निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथील बळीराम व्यंकट हणमंते (वय ३५ वर्षे) यांच्या अंगावर आंब्याचे झाड पडुन ते मयत झाले आहेत त्यांच्या पश्चात पनी, दोन मुले व वडील आहेत. तसेच शेळगी येथील शेतकरी दत्तात्रय गोविंद रोडे यांची म्हेस विज पडून मयत झाली आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील हालकी येथे सायंकाळी पाच वाजता गंगाधर माधवराव बामनकर यांची एक म्हस वीज पडून मयत झाली.

तालुक्यातील तांदुळजा येथे वीज पडून ईश्वर सराफ यांची एक म्हेस आणि काटगाव (कृष्णानगर तांडा) येथील विठ्ठल राठोड यांची म्हेस किन पडून मयत आली आहे. रविवारी आलेल्या आवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची व पशुधनाची जिवीत हाणी झाली आहे. तसेच फळझाडांचेही माठे नुकसान झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR