23.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीय११० मतदारांचे चंदेल कुटुंब

११० मतदारांचे चंदेल कुटुंब

पाटणा : देशात लोकसभा निवडणूक २०२४ ची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. पाटण्यात १ जूनला मतदान पार पडणार आहे. मात्र पाटणा साहिब लोकसभा मतदारसंघातील लोहणीपूर गावातील चंदेल निवास येथे उमेदवारांची वेगळीच धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्याला कारणही तसेच आहे. ‘चंदेल निवास’ या एकाच घरात तब्बल ११० मतदार आहेत. त्यामुळे चंदेल निवासातील मत प्रत्येक उमेदवारांसाठी निर्णायक ठरत असल्याचे बोलले जाते.

पाटणा इथल्या लोहणीपूर गावात ‘चंदेल निवास’ आहे. या चंदेल निवासात तब्बल ११० मतदार असल्याने उमेदवारांचे भवितव्य ठरवण्याची क्षमता चंदेल निवासातील मतदारांमध्ये आहे.

चंदेल निवासातील मतदार अत्यंत जागरूक आहेत, सुशिक्षित आहेत. त्यामुळे मत देण्यापूर्वी ते एकमेकांशी चर्चा करतात. त्यानंतर एका उमेदवारावर एकमत झाल्यानंतर त्याला मत देतात. त्यामुळे चंदेल निवासातील मते मिळवण्यासाठी उमेदवारांची धडपड असते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR