25.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयमालीवाल प्रकरणात बिभव कुमार यांनी ठोठावला हायकोर्टाचा दरवाजा

मालीवाल प्रकरणात बिभव कुमार यांनी ठोठावला हायकोर्टाचा दरवाजा

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण केल्याप्रकरणी ट्रायल कोर्टाने जामीन नाकारल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असून, ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. विभवने दाखल केलेल्या याचिकेत आपली अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे, यासोबतच आपल्या बेकायदेशीर अटकेसाठी नुकसानभरपाईची मागणीही बिभव यांनी आपल्या याचिकेत केली आहे.

बिभव यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उद्या म्हणजेच गुरुवारी सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. मला जबरदस्तीने पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्याची भरपाई देण्यात यावी आणि बेकायदेशीर अटक केल्याबद्दल पोलिसांची विभागीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे. आप खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेले केजरीवाल यांचे खासगी सचिव बिभव कुमार यांना न्यायालयाने मंगळवारी पुन्हा तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

चार दिवसांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर बिभवला महानगर दंडाधिकारी गौरव गोयल यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी बिभवला पाच दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र न्यायदंडाधिका-यांनी तीन दिवसांची कोठडी दिली. आता त्यंना ३१ मे रोजी हजर केले जाणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR