28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयदिल्ली दंगल प्रकरणातील शरजील इमामला जामीन

दिल्ली दंगल प्रकरणातील शरजील इमामला जामीन

नवी दिल्ली : दिल्लीच्या जामिया परिसरात आणि अलिगढ मुस्लिम विद्यापीठात (एएमयू) प्रक्षोभक भाषणे केल्याच्या आरोपाखाली दाखल झालेल्या राजद्रोह आणि बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (यूएपीए) प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी शरजील इमामला वैधानिक जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती मनोज जैन यांच्या खंडपीठाने त्याच्यावर लावण्यात आलेल्या गुन्ह्यांसाठी अर्धी शिक्षा आधीच भोगलेली आहे हे लक्षात घेऊन हा आदेश दिला.

दरम्यान, इमाम तुरुंगातच राहील कारण तो २०२० च्या दिल्ली दंगलीशी संबंधित एका मोठा कट रचल्या प्रकरणातही आरोपी आहे. भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शरजील इमामला तब्बल चार वर्षांनंतर जामीन मिळाला आहे.

फेब्रुवारीमध्ये दिल्ली न्यायालयाने शरजील इमामला वैधानिक जामीन देण्यास नकार दिला होता. यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दाखल केलेल्या गुन्ह्यात इमामवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, जो सुरुवातीला देशद्रोहाच्या गुन्ह्यासाठी नोंदवण्यात आला होता आणि नंतर यूएपीएचे कलम १३ लागू करण्यात आले होते. याप्रकरणी २८ जानेवारी २०२० पासून शरजील कोठडीत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR