22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रतहसीलदारासह कोतवाल जाळ््यात

तहसीलदारासह कोतवाल जाळ््यात

केज : प्रतिनिधी
रेशन दुकानावर कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना केजमधील कोतवाल जाळ््यात अडकला. तसेच केजमधील तहसीलदार अभिजित पाटील हेही यात आरोपी आहेत. मात्र, ते फरार असल्याने त्यांच्यावर कारवाई होऊ शकली नाही. मात्र, या धडाकेबाज कारवाईमुळे एसीबीचे कौतुक होत आहे. धाराशिव येथील पथकाने शुक्रवारी रात्री १० वाजता ही कारवाई केली.

दरम्यान, बीड जिल्ह्यातील लाचखोरीचे सत्र सुरूच असून, एसीबीकडून कारवाचा धडाका चालूच आहे. अभिजित पाटील हा केजचा तहसीलदार आहे. मच्छिंद्र माने हा कोतवाल आहे. तो पाटील यांच्यासाठी वसुलीचे काम करतो, हे काम सुरू असताना एसीबीने कारवाई केली आणि कोतवालाला ताब्यात घेतले. मात्र, तहसीलदार फरार आहे.
केज तालुक्यातील एका रेशन दुकानदारावर कारवाई प्रस्तावित होती. ती न करण्यासाठी तहसीलदार पाटील याने २० हजार रुपयांची लाच मागितली होती. हीच लाच कोतवाल माने याने स्वीकारली. परंतु तहसीलदार पाटील फरार आहे. धाराशिव येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आठवड्यातील ही दुसरी कारवाई आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR