28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeनांदेडनांदेडच्या वाडीबुद्रुक येथे ४३६ बंदुकीच्या जिवंत गोळ्यांचा साठा सापडला

नांदेडच्या वाडीबुद्रुक येथे ४३६ बंदुकीच्या जिवंत गोळ्यांचा साठा सापडला

नांदेड : नांदेड शहरातील भाग्यनगर हद्दीत जवळपास ४३६ बंदुकीच्या जिवंत गोळ्या सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळ्या पोलिस किंवा सर्वसामान्यांसाठी वापरात येणा-या गोळ्या नाहीत. पावडेवाडी गावाजवळ एका नाल्यात गोळ्यांचा साठा पडलेला आढळला. घटनास्थळी श्वानपथकासह एटीएसची टीम दाखल झाली आहे. या बंदुकीच्या गोळ्या लाईट मशिनगनमध्ये वापरल्या जातात अशी पोलिसांत चर्चा असून पुढील तपास नांदेड पोलिस करत आहेत.

दरम्यान, दिवसेंदिवस नांदेड येथे गोळीबाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. यात भर पडली ती आजच्या वाडीबुद्रुक येथील घटनेची. या भारतीय सीमेवर वापरल्या जाणा-या गोळ्या असून एका शेतकरी मुलाला दिसल्या. त्याने याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी भेट दिली असता घटनास्थळी त्यांना जिवंत बंदुकीच्या गोळ्यांचा साठा सापडला. घटनास्थळी नांदेडचे पोलिस अधीक्षक, सोबत एटीएसचे पथकही हजर झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR