27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeलातूरप्रा. सावंत यांना राष्ट्रीय धम्मसंगिती पुरस्कार प्रदान

प्रा. सावंत यांना राष्ट्रीय धम्मसंगिती पुरस्कार प्रदान

लातूर : प्रतिनिधी
राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्रा. देवदत्त सावंत यांना धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, कोल्हापूरचा अत्यंत सन्मानाचा व प्रतिष्ठेचा राष्ट्रीय धम्मसंगिती पुरस्कार २०२४ राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे मान्यवरांच्या हस्ते कोल्हापुरी फेटा, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व ग्रंथ देऊन प्रदान करण्यात आला.

दुस-या सत्यशोधक विश्व धम्म परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत अ‍ॅड. कृष्णा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी जेष्ठ लेखक लक्ष्मण माळी, भारतीय बौद्ध महासभेचे एस. पी. दीक्षित, निर्मिती प्रकाशनचे अनिल म्हमाने, शाक्यपुत्र संबोधि (थेरो), आर. आनंद, करुणा विमल आदि मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रा. देवदत्त सावंत यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी प्रा. शहाजी कांबळे, डॉ. नंदकुमार गोंधळी, किशोर खोबरे, प्रा. टी. के. सरगर, निती उघाडे आणि प्रा. देवदत्त सावंत यांची समायोजित भाषणे झाली.

राष्ट्रीय धम्म संगिती पुरस्कार २०२४ पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. देवदत्त सावंत यांचे धम्मगुरु डॉ. उपगुप्त महास्थवीर, पय्यानंद थेरो, प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे, प्राचार्य डॉ. संजय गवई, प्रा. प्रशांत लामतूरे, प्रा. संजय बिरादार, प्रा .उत्तम दोरवे, प्रा. राजकुमार बनसोडे, प्रा. विठ्ठल जाधव, अनिरुद्ध बनसोडे, उदय सोनवणे, मिलिंद धावारे, भाग्यश्री सावंत, ममता गवई कौतुक केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR