बीड : पहिल्या पाच फे-यांमध्ये आघाडी घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पुढील चार फे-यांमध्ये जोरदार टक्कर द्यावी लागली. बाराव्या फेरीनंतर त्यांनी १६४४ मतांची आघाडी घेतली. सातव्या फेरीच्या मोजणीनंतर सोनवणे यांनी २०३ मतांची आघाडी घेतली होती. परंतू आठव्या फेरीत भाजप महायुतीच्या पंकजा मुंडे यांनी सोनवणे यांना पिछाडीवर टाकत ९३६६ मतांची आघाडी घेतली.
नवव्या फेरीतही पंकजा मुंडे पुढे राहिल्या, या फेरीत १० हजार २४४ मतांची आघाडी घेतली. दहाव्या फेरीत हे मताधिक्य ११९५५ वर पोहचले. परंतू ११ व्या फेरीत बजरंग सोनवणे यांनी मताधिक्य कापल्याने पंकजा मुंडे यांचे मताधिक्य २१११ मतांवर खाली आले. तर बाराव्या फेरीअखेर बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांना मागे टाकत १६४४ मताधिक्य घेतले. तेराव्या फेरीअखेर बजरंग सोनवणे यांनी ६४७३ मतांची आघाडी घेतली. आठव्या फेरीपासून तेराव्या फेरीपर्यंत चुरशीचा सामना पाहायला मिळाला.