अकोला : लोकसभा निवडणुकीत अकोल्याचा आणि उर्वरित महाराष्ट्राचा जनादेश मी नम्रपणे स्वीकारतो. मी प्रत्येक वंचित आघाडीच्या कार्यकर्त्याचे त्यांच्या अथक प्रयत्नांसाठी आणि पक्षाप्रती ठोस समर्पण केल्याबद्दल आभार मानू इच्छितो. मी नवनिर्वाचित खासदारांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीचा पराभव केला, असे प्रकाश आंबेडकर म्हणालेत.
तसेच पक्ष जिंकला नाही म्हणून मी निराश आहे, पण मी आशा सोडलेली नाही. माझे सहकारी आणि मी आमच्या पराभवाच्या कारणांचे आत्मपरीक्षण करू आणि त्यांचे विश्लेषण करू आणि आगामी काळात पक्ष मजबूत करण्यासाठी काम करू.वंचित बहुजन आघाडी विजय असो!, असेही प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.