पुणे : प्रतिनिधी
दिलीप वळसे पाटील यांची मुलगी पूर्वाकडून अमोल कोल्हे यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. शिरूरमधील विजयानंतर पूर्वा वळसेंकडून कोल्हेंना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होती.
या लढतीत शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे विजयी झाले. ‘डॉ. अमोल कोल्हेंचा दणदणीत विजय; मन:पूर्वक अभिनंदन’ असा मजकूर टाकत सोशल मीडियावर शेअर करत वळसे पाटलांच्या मुलीकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.