नवी दिल्ली : देशात लवकरच उपग्रह म्हणजेच सॅटेलाईटवर आधारित इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली लागू केली जाणार असून जीएनएसएस-आधारित इलेक्ट्रॉनिक टोल संकलनामुळे अधिक कार्यक्षम टोल संकलन होणार आहे. याबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय)ने जागतिक निविदा मागविल्या आहेत. ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम (जीएनएसएस) वर आधारित ही प्रणाली राष्ट्रीय महामार्गांवर चालणा-या वाहनांना अखंड टोल संकलनाचा अनुभव देईल असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. एनएचएआयच्या या उपक्रमाचा उद्देश महामार्गांवरील सध्याची टोल बूथ प्रणाली संपविणे हा आहे.
एनएचएआयने सध्याच्या फास्टटॅग इकोसिस्टममध्ये जीएनएसएस-आधारित इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (ईटीसी) प्रणाली लागू करण्याची योजना आखली आहे. सुरुवातीला संकरित मॉडेल वापरुन जेथे आरएफआयडी-आधारित ईटीसी आणि जीएनएसएस-आधारित ईटीसी दोन्ही एकाच वेळी कार्य करतील, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनानुसार, टोल प्लाझावर समर्पित जीएनएसएस लेन उपलब्ध असतील, ज्यामुळे जीएनएसएस-आधारित ईटीसी वापरणा-या वाहनांना मुक्तपणे जाण्याची परवानगी मिळेल. राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना अखंड टोल संकलनाचा अनुभव प्रदान करण्यासाठी आणि टोल ऑपरेशनची कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी, इंडियन हायवे मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने (आयएचएमसीएल) एनएचएआय ही कंपनी, जीएनएसएस आधारित इलेक्ट्रॉनिक विकसित आणि लागू केली आहे. भारतातील टोल संकलन प्रणाली लागू करण्यासाठी पात्र कंपन्यांना आमंत्रित केले आहे.
सॅटेलाईट टोल संदर्भात निवेदन जारी
अॅडव्हान्स सॅटेलाइट तंत्रज्ञानाचा फायदा घेण्यासाठी, ईओएलचे उद्दिष्ट आहे की अनुभवी आणि सक्षम कंपन्यांची ओळख पटवणे जे एक मजबूत, स्केलेबल आणि कार्यक्षम टोल चार्जर सॉफ्टवेअर देऊ शकतात. तसेच जे ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (जीएनएसएस) आधारित इलेक्ट्रॉनिकच्या अंमलबजावणीसाठी आधार म्हणून काम करतील. अशा प्रकारची माहिती निवेदनात दिली आहे.
वाहनधारकांना काय फायदा?
जीएनएसएस-आधारित इलेक्ट्रॉनिक टोल संकलनाची भारतात अंमलबजावणी केल्याने राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची सुरळीत हालचाल सुलभ होईल. तसेच हायवे वापरकर्त्यांना अनेक फायदे मिळतील जसे की अडथळा-कमी फ्री-फ्लो टोलिंग ज्यामुळे त्रास-मुक्त रायडिंग अनुभव आणि अंतर-आधारित टोलिंग जेथे वापरकर्ते फक्त राष्ट्रीय महामार्गावर केलेल्या प्रवासासाठी पैसे देतील, असे त्यात म्हटले आहे. जीएनएसएस-आधारित इलेक्ट्रॉनिक टोल संकलनामुळे अधिक कार्यक्षम टोल संकलन देखील होईल कारण ते गळती बंद करण्यात आणि टोल चुकविणा-यांना तपासण्यात मदत करते.