सांगली : प्रतिनिधी
बनावट नोटा बनवणा-या कारखान्यावर छापा टाकत सांगली पोलिसांनी १ लाख ९० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. जुन्या पद्धतीच्या ५० रुपयांच्या बनावट नोटा बनवल्या जात होत्या. यावेळी पोलिसांनी मशिनरीसह ३ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, या प्रकरणी सांगली पोलिसांनी एकास अटक केली. अहद महंमद अली शेख असे संशयित आरोपीचे नाव आहे.
सांगलीतील मिरजमध्ये बनावट नोटा बनवणा-या कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी एकास अटक केली. अहद महंमद अली शेख असे त्याचे नाव आहे. सांगली शहर पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत तब्बल १ लाख ९० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. संशयित अहद शेख हा बनावट नोटा वापरात आणण्याासाठी सांगली बसस्थानकात येणार असल्याची माहिती सांगली शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून अहद शेख यास अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५० रुपयांच्या जुन्या पद्धतीच्या बनावट नोटा असल्याचे निदर्शनास आले. त्यातच चौकशीत मिरजेत बनावट नोटांचा कारखानाच थाटल्याची बाब समोर आली. त्यामुळे खळबळ उडाली आहे.