18.8 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeराष्ट्रीयअमेठीत रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू; सहा जखमी

अमेठीत रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू; सहा जखमी

अमेठी : अत्तर प्रदेशमधील अमेठीमध्ये भीषण रस्ता अपघात झाला आहे. तेथे भरधाव वेगात असलेली बोलेरो कार बुलेट बाईकला धडकल्यानंतर झाडावर आदळली. या अपघातात तीन महिला आणि एका मुलासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक गावक-यांच्या मदतीने घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना स्थानिक जिल्हा रुग्णालय आणि सुलतानपूर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान जखमी पैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुलतानपूर जिल्ह्यातील इस्लामगंज गावचा रहिवासी असलेला अकबर बोलेरो गाडीतून आपल्या कुटुंबाला घेऊन मुन्शीगंज येथे जात होता. यावेळी बोलेरो जामो भादर चौकाजवळ आली असता जामोकडून येणा-या बुलेटला जोरदार धडक देऊन झाडावर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की बुलेटस्वार दुर्गेश उपाध्याय, मुलगा राम इक्बाल आणि बहीण वंदना यांचा जागीच मृत्यू झाला तर चार वर्षांचा पुतण्या रुद्र गंभीर जखमी झाला आहे. तर बोलेरो गाडीमधील शाहनूर जागीर खान (४० ), शबनम दिलशाद खान (३५) यांचा जागीच मृत्यू झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR