जळगाव : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वांत गाजणारे प्रकरण म्हणजे नीट २०२४ चा निकाल. ‘नीट’ परीक्षेत मोठा गोंधळ झाल्याचा आरोप सातत्याने केला जातो आहे. हेच नाही तर आता विद्यार्थ्यांनी थेट ‘नीट’ परीक्षा रद्द करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. जळगावातून दोन विद्यार्थ्यांकडून ही याचिका दाखल करण्यात आली असून ‘नीट’ परीक्षेत घोटाळ्याची चौकशी व्हीवी यासाठी राज्यातील हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरली आहेत.
दरम्यान, ‘नीट’ परीक्षेचा मुद्दा लोकसभेत मांडणार असल्याचे राहुल गांधी यांच्याकडूनही स्पष्ट करण्यात आले आहे. खूप मोठा गोंधळ या परीक्षेत झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. हेच नाही तर अनेकांना या परीक्षेत अधिकचे मार्क पडल्याचे देखील दिसत आहे. नीट परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत हजारोच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे देखील बघायला मिळत आहे. देशभरातून विद्यार्थ्यांमध्ये रोष बघायला मिळत आहे.
जळगावच्या चाळीसगावमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून जोरदार घोषणाबाजी करता चाळीसगावमध्ये विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. ब-याच ठिकाणी ‘नीट २०२४’ चा पेपर लीक झाल्याच्या आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. झालेली ‘नीट’ परीक्षा रद्द करून पुन्हा ‘नीट’ परीक्षा घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
छ.संभाजीनगरमध्ये मुक निदर्शने
छत्रपती संभाजीनगरमध्येही विद्यार्थी आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. विद्यार्थ्यांनी निदर्शने केली असून निकालाची फेर तपासणी करून निकाल परत देण्याची मागणी करण्यात आलीये. नीट परीक्षेमध्ये झालेल्या गोंधळाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी एकत्र येत मुक निदर्शने सुरु केली. छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात नीट परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत आणि हातात वेगवेगळ्या प्रकारचे फलक घेत निषेध व्यक्त केला.
पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन
नीट प्रशासनाच्या विरोधात पुण्यात विद्यार्थी संघटना देखील आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या गेटवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन केले आहे. निकालाची फेर तपासणी करून निकाल परत देण्याची देखील मागणी विद्यार्थ्यांची आहे. यावेळी विद्यार्थी घोषणाबाजी करताना देखील दिसले.
धाराशिव येथे जिल्हाधिका-यांना निवेदन
धाराशिवमध्ये नीट युजी परिक्षा नीट युजी परिक्षा पुन्हा एकदा घेण्यात यावी अशी मागणी धाराशिव येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ व विद्यार्थ्यांनी जिल्हाधिका-यांडे निवेदनाद्वारे केली आहे. नीट परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचे सातत्याने सांगितले जात आहे. काही विद्यार्थ्यांना ७२० पेक्षाही अधिक मार्क पडल्याने हा प्रकार उघडकीस आला. आता यावर प्रशासन काय भूमिका घेते याकडे विद्यार्थ्यांसह पालकांच्या देखील नजरा लागल्या आहेत.