24.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeराष्ट्रीय७ राज्यातील १३ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर

७ राज्यातील १३ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाने आज पश्चिम बंगालमधील चार जागांसह सात राज्यांतील १३ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. विद्यमान सदस्यांच्या निधनामुळे किंवा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागांवर १० जुलै रोजी पोटनिवडणूक होणार आहेत.

ज्या विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार आहेत त्यामध्ये बिहारमधील रुपौली, पश्चिम बंगालमधील रायगंज, राणाघाट दक्षिण, बागडा आणि माणिकतला, तामिळनाडूमधील विक्रवंडी, मध्य प्रदेशमधील अमरवाडा, उत्तराखंडमधील बद्रीनाथ आणि मंगलोर, पंजाबमधील जालंधर पश्चिम आणि हिमाचल प्रदेशमधील हमीपूर आणि दे नालागड या मतदारसंघाचा समावेश आहे.

संपूर्ण निवडणूक वेळापत्रक

निवडणुक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, १४ जून रोजी पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी होणार असून, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २१ जून आहे. २४ जून रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २६ जून आहे. तर १० जुलै रोजी पोटनिवडणूक होणार असून १३ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR