18.8 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रभिवंडीत डायपरच्या कंपनीला भीषण आग

भिवंडीत डायपरच्या कंपनीला भीषण आग

भिवंडी : प्रतिनिधी
भिवंडीच्या सरवली एमआयडीसीमध्ये डायपर बनवणा-या एका कंपनीला भीषण आग लागली. या आगीत तीन मजली इमारत पूर्ण जळाली आहे. सकाळी ३ वाजेच्या सुमारास आग लागली. अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही.

अपघाताचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत तीन मजली इमारत पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सदाशिव हायजिन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये आग लागली असून पहिल्या मजल्यावर लागलेली आग तिस-या मजल्यापर्यंत पसरली. कंपनीमध्ये कागद, कपडा, प्लास्टिक मोठ्या प्रमाणात असून आगीचे लोळ सर्वत्र पसरले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळे येत आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या कंपनीत डायपर बनवले जातात.

मंगळवारी सकाळी ३ वाजता अचानक कंपनीत आग लागली असून आगीने एकाएकी रौद्र रूप धारण केले. कंपनीचे कर्मचारी वेळीच बाहेर पडले. यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR