लातूर : प्रतिनिधी
माजी प्राचार्य डॉ. नागनाथ मोटे यांच्या विवाह सहजीवनाचा सुवर्ण महोत्सव आणि वयाचा अमृत महोत्सव दि. ९ जून रोजी अनुसया मंगल कार्यालयात झाला. यावेळी डॉ. मोटे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरु डॉ. जनार्दन वाघमारे होते. प्रमुख पाहूणे म्हणून कोल्हापूर विद्यापीठाचे प्रा. डॉ. एम. बी. चव्हाण, माजी महापौर अॅड. दीपक सुळ, स्वागताध्यक्ष अॅड. अण्णाराव पाटील, माजी आरोग्य सभापती भानुदास सोलंकर, माजी नगरसेविका रागिणी यादव, संभाजी सुळ, माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी गो. मा. मांडुरके, बिटूबाई सोलंकर, सत्कारमूर्ती डॉ. नागनाथ मोटे व विद्यावती मोटे हे उपस्थित होते.
यावेळी डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. जय्रदथ जाधव, डॉ. एम. बी. चव्हाण, प्रतिक्षा देवकते, प्रणवी मोटे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. कमलाकर मोेटे यांनी केले. सूत्रसंचालन दुर्गाप्रसाद मोटे यांनी केले. तर तनया पांढरे यांनी आभार मानले. या कार्य्रकमाला डॉ. मल्लिकार्जून करजगी, डॉ. शेषराव मोहिते. प्रा. फ. म. शहाजिंदे, पांडुरंग अडसुळे, बंडू किसवे, बंडू सोलंकर, डॉ. भातांबे्र, सुभाष लवटे, प्रा. पळसकर, डॉ. जोरगुलवार यांच्यासह विविध क्षेत्रातील असंख्य मोटे स्रेही उपस्थित होते.