26.3 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeलातूरअवैध वाहतुकीने घेतला चिमुकलीचा बळी

अवैध वाहतुकीने घेतला चिमुकलीचा बळी

वलांडी : देवणी तालुक्यातील धनेगाव येथे मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपमधून पडुन दुर्दैवी म‌त्यु झाल्याची घटना घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, धनेगाव येथे वडार समाज बांधवांतील चार जणांचा विवाहसोहळा आहे. त्यासाठी पाहुणे मंडळी येत आहेत. तसेच औसा तालुक्यातील सेलु येथील पाहुणे धनेगाव येथे येत असताना आपल्या आईसोबत असलेली प्रतिक्षा राम बंडगर वय अडीच वर्ष ही जीप क्रमांक एम एच ४४ बी १९४४ या जीप मधून पडल्याने जागीच मृत्यू झाला.

चिमुकलीच्या या आकस्मित मृत्युने समाजबांधवांसह गावात हळहळ व्यक्त होत आहे.घटनास्थळी देवणी पोलिस ठाण्याचे पोलिस दाखल झाले असुन सदर घटनेचा पंचनामा केला आहे. निलंगा उदगीर राज्यमार्गावर बहुतांश बसगाड्या थांबत नसल्याने प्रवाशी अवैध वाहतुकीचा सहारा घेत आहेत.शिवाय पोलिसवालेही या अवैध वाहतुकीकडे दुर्लक्ष करत असल्याने अशा घटना घडत आहेत.निलंगा व उदगीर आगाराने बसच्या चालक व वाहकांना सुचना करुन बस थांब्यावर बसेस थांबवण्याच्या सक्त ताकीद द्यावी अन्यथा प्रवासी आंदोलनं करणार असल्याची चर्चा घटना स्थळी होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR