30.4 C
Latur
Sunday, September 29, 2024
Homeमहाराष्ट्रबजरंग सोनवणे यांचा अजित पवार यांना फोन?

बजरंग सोनवणे यांचा अजित पवार यांना फोन?

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे बीडचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केल्याची माहिती समोर येत आहे.

त्यामुळे शरद पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे अजित पवार यांच्या गळाला तर लागले नाहीत ना? अशा चर्चेला आता उधाण आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये फोनवर जवळपास १० मिनिटे चर्चा झाली आहे. तर शरद पवार गटातील आणखी काही आमदार अजित पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी याबाबतचा मोठा दावा केला आहे.
बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांना फोन केल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. मला पदरात घ्या, असे सोनवणे अजित पवारांना म्हणाले असतील, असा मोठा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. अमोल तटकरे यांनी याबाबत ट्वीट केले आहे.
ट्वीटच्या माध्यमातून एक गोष्ट मला महाराष्ट्राच्या समोर आणायची आहे, तळागाळातील, सोशितांचे, वंचितांचे, शेतक-यांचे, कष्टक-यांचे, ऊसतोड कामगारांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, हे सोडवण्यासाठी एकच नेता सक्षम आहे, तो नेता म्हणजे अजित पवार. त्यामुळे आज सकाळी बजरंग सोनवणे यांचा अजित पवार यांना फोन आला. तो फोन साखर कारखान्याच्या संदर्भात होता.

पण तो फोन असाही असू शकतो की, बजरंग सोनवणे हे अजित पवार यांच्याकडे आपल्याला पुन्हा आपल्या गटात घ्यावे, अशी विनंती करत असावेत. शरद पवार गटात आपले भविष्य उज्ज्वल नाही. त्यामुळे त्यांनी अजित पवार गटात घेण्यासाठी विनंती केली असेल, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे.

फोन केलाच नाही; सोनवणेंचा दावा
बीडच्या बप्पाचा दादांना फोन असे टवीट् अजित पवार गटाचे आ. अमोल मिटकरी यांनी केले होते. या नंतर खा. बजरंग सोनवणे यांनी हा दावा धुडकावून लावत आपण मरेपर्यंत शरद पवार यांच्यासोबत राहू, असे स्पष्ट शब्दात सांगून टाकले. ‘बीडच्या बप्पाचा दादांना फोन’ अशा आशयाचे ट्वीट आ. अमोल मिटकरी यांनी केले आहे. त्यामुळे शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतही खासदार फुटीची भीती आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र, या प्रकरणावर खा. बजरंग सोनवणे यांनी स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, मी मरेपर्यंत शरद पवार साहेबांसोबतच राहणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR