24.9 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeसोलापूरजलतरण तलावातील मृत्यू प्रकरणी क्रीडाधिकाऱ्यांचे वेतन कपात

जलतरण तलावातील मृत्यू प्रकरणी क्रीडाधिकाऱ्यांचे वेतन कपात

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या वीर सावरकर जलतरण तलावात एका युवकाचा बुडून मृत्यू झाला. या प्रकरणात क्रीडा अधिकारी श्रीकांत घोलप यांच्यावर एक दिवसाची बिन पगाराची कारवाई करण्याचे आदेश आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिले.

पार्क स्टेडियमजवळील वीर सावरकर जलतरण तलावात प्रवीण शिवानंद बहिरमठ (वय २२, रा. भवानी पेठ) या तरुणाचा ३ जून रोजी बुडून मृत्यू झाला. मनपा अधिकाऱ्यांना या घटनेची कल्पना नव्हती. जलतरण तलावात सुरक्षा यंत्रणा नव्हती. यावरून माजी क्रीडा अधिकाऱ्यांनी, क्रीडापटूंनी टीकेची झोड उडवली.
दरम्यान, क्रीडाधिकारी श्रीकांत घोलप यांनी याप्रकरणी वरिष्ठ नियंत्रण अधिकारी यांना वेळोवेळी माहिती देणे आवश्यक होते.

याप्रकरणी पोलिसात काय नोंद झाली? संबंधित जलतरण तलावामध्ये नेमके काय घडले यासंदर्भात माहिती घेऊन कळवणे गरजेचे होते, असा ठपका ठेवण्यात आला. या प्रकरणात घोलप यांच्यावर वेतन कपातीची कारवाई झाली.मनपा अधिकाऱ्यांचे मैदान, जलतरण तलाव याकडे लक्ष नाही. वरिष्ठ अधिकारी आपले कार्यालय सोडून बाहेर जात नाहीत. मैदानांची, जलतरण तलावांची पाहणी करीत नाहीत. आता केवळ वेतन कपातीच्या कारवाईपेक्षा आणखी कडक कारवाई व्हायला हवी, असे मत माजी क्रीडाधिकारी नजीर शेख यांनी व्यक्त केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR