21.2 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रअपघात भासवून सास-याची हत्या

अपघात भासवून सास-याची हत्या

‘क्लास वन’अधिकारी बहीण-भावाचा कट धक्कादायक खुलासे

नागपूर : प्रतिनिधी
नागपूरमधील हिट अँड रन प्रकरण हे घातपाताचे असल्याचा उलगडा झाल्यानंतर यात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. पुरुषोत्तम पुट्टेवार यांची ३०० कोटी रुपयांच्या संपत्तीसाठी सुनेनेच हत्या घडवून आणल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

क्लास वन अधिकारी असणा-या अर्चना पुट्टेवार हिने ड्रायव्हरला हाताशी धरून आपल्याच सास-याच्या खुनाची १ कोटी रुपयांची सुपारी दिली. यामध्ये सुनेच्या अधिकारी भावाचाही हात असल्याची माहिती आता समोर येत आहे. या प्रकरणी सुनेसह तिचा भाऊ आणि इतर चौघांना अटक करण्यात आली आहे. पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या खून प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्या प्रकरणी गडचिरोलीत नगरविकास सहायक संचालक असलेल्या अर्चना पुट्टेवार हिच्यासह चालक सार्थक बागडे, नीरज निमजे, सचिन धार्मिक यांना अटक करण्यात आली होती. यात कुणाला सुपारी दिली गेली, कोणाचा हात होता याचा शोध पोलिसांनी घेतला.

पुरुषोत्तम पुट्टेवार हत्या प्रकरणात सून अर्चना पुट्टेवार हिच्या भावाचेही नाव समोर आले आहे. एनएसएमई संचालक असलेल्या प्रशांत पार्लेवार आणि आर्किटेक्ट असणा-या पायल नागेश्वर यांची नावे समोर आली आहेत. पायल ही अर्चनाची सहायक होती. तिच्या माध्यमातूनच हा पैशांचा व्यवहार व्हायचा. बहिणीला तिच्या सास-याचा खून करण्यासाठी प्रशांतने मदत केल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी दिली.

नागपूरमध्ये २२ मे रोजी ८२ वर्षांच्या पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा कारने चिरडून मृत्यू झाला होता. हिट अँड रन अपघात असल्याचे प्रथमदर्शनी आढळले होते. पण पोलिस तपासात हा खून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. अपघात असल्याचे भासवून खून करण्याचा कट सुनेनेच रचला होता.

अर्चना ही पुरुषोत्तम पुट्टेवार यांची सून असून पुट्टेवार यांची मुलगी योगिता हिचे लग्न अर्चनाचा भाऊ प्रवीण याच्याशी झाले होते. मात्र प्रवीणचा २००७ मध्ये मृत्यू झाला. यानंतर योगितासोबत तिचे वडील पुरुषोत्तम हे रहायचे. योगिताला पुरुषोत्तम यांच्या संपत्तीतील मिळणारा हिस्सा आपल्याला मिळवता येईल यासाठी पुरुषोत्तम यांच्या खुनाचा कट सून अर्चना आणि तिचा दुसरा भाऊ प्रशांत यांनी रचला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR